शाहरुखच्या 'पठाण'ने जगभरात 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.

शाहरुख खान खऱ्या अर्थाने जगभरातील बॉक्स ऑफिसवरचा बादशाह ठरला आहे.

'पठाण' या सिनेमाने देशात 623 कोटींचा गल्ला जमवला आहे.

'पठाण'ने रिलीजच्या 27 व्या दिवशी जगभरात 1000 कोटींची कमाई केली आहे.

1000 कोटींचा टप्पा पार करणारा 'पठाण' हा भारतातील पाचवा सिनेमा ठरला आहे.

'पठाण' सिनेमाच्या माध्यमातून किंग खानने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं होतं.

वर्षाच्या सुरुवातीलाच 'पठाण' या सिनेमाने सर्वाधिक कमाई करत बॉलिवूडला सुगीचे दिवस दाखवले आहेत.

'पठाण' हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'पठाण' लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील प्रदर्शित होणार आहे.

'पठाण' सिनेमाचा दुसरा भागदेखील पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.