आलिया भट्ट सध्या आपला आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडीचं प्रमोशन करतेय. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आलाय. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रत्येकजण आलियाच्या कामाचं कौतुक करताना दिसतंय. प्रमोशनसाठी आलिया हटके फॅशन ट्रेंड फॉलो करताना दिसतेय. आलिया भट्ट प्रमोशनदरम्यान पांढऱ्या रंगाच्या साड्या वेगवेगळ्या स्टाईल्समध्ये वेअर करताना दिसतेय. गंगूबाई काठियावाडीमध्ये तिनं पांढऱ्या रंगाच्याच साड्या परिधान केल्या आहेत. आता आलियाचा आणखी एक नवा लूक समोर आला आहे. प्रमोशनसाठी आलियानं पांढऱ्या रंगाची साडी ब्लॅक ब्लाउजसह वेअर केली आहे. ज्यामध्ये ती अत्यंत सुंदर दिसतेय. त्यासोबतच तिनं केसांची वेणी बांधली आहे. तर कानामध्ये झुमके वेअर केलेत. आलियानं आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर फोटो शेअर केलेत.