अनेक जण दारुचे शौकीन आहेत. दारुचे विविध प्रकार आहेत.



कुणाला बियर, कुणाला व्हिस्की, कुणाला रम, कुणाला वाईन तर कुणाला आणखी काही आवडतं.



तुम्ही आतापर्यंत द्राक्ष, तांदूळ, बटाटा, ऊस यापासून दारु तयार होते हे तुम्ही ऐकलं असेल. पण आम्ही तुम्हाला सांगितलं की, लाकडापासूनही दारु तयार होते, तर तुमचा त्यावर विश्वास बसेल का?



संशोधकांनी आता लाकडापासूनही दारु तयार करण्याच्या पद्धतीचा शोध लावला आहे. जपानमधील काही वैज्ञानिकांनी हा दावा केला आहे. हा दावा खरा ठरल्यास जगभरातील दारु तयार करण्याची पद्धत खूप बदलून जाईल.



आता संशोधकांनी लाकडापासून म्हणजेच झाडापासून दारु तयार करण्याची पद्धत शोधली आहे.



जपानमधील वैज्ञानिकांनी ही कल्पना शोधली आहे. जपानमधील देवदार नावाच्या झाडापासून दारु तयार केली जाऊ शकते, असं वैज्ञानिकांचं मत आहे.



जपानमध्ये 1600 साली ताहोका येथे देवदार प्रजातीचं झाडं लावण्यात आलं. 1916 मध्ये या झाडामधून पांढऱ्या रंगाचा द्रवपदार्थ बाहेर पडत असल्याचं निदर्शनास आलं.



या देवदार झाडामधून सुमारे 35 लीटर द्रवपदार्थ बाहेर पडला. आता संशोधकांनी या द्रवपदार्थापासून अल्कोहोल तयार करण्याच्या पद्धतीचा शोध लावला आहे.



तज्ज्ञांच्या मते, देवदार आणि चेरीच्या झाडांच्या लाकडापासून आधी मिथेनॉल मिळवले जातं. हे मिथेनॉल पिण्यायोग्य नाही आणि शरीरासाठी हानिकारक आहे.



मिथेनॉलचा वापर पेंट प्लॅस्टिक आणि पेंट बनवण्यासारख्या कामांमध्ये केला जातो. याशिवाय त्याचा वापर इंधन बनवण्यासाठीही होतो.



ओत्सुका नावाच्या जपानी तज्ज्ञानं झाडापासून अल्कोहोल (इथेनॉल) बनवण्याचा मार्ग शोधून काढला आहे. इथेनॉलपासून बिअर, वोडका आणि वाईन बनवली जाते.



ओत्सुका यांनी लाकडापासून इथेनॉल मिळविण्यासाठी एक विशेष पद्धत अवलंबली आहे. ओत्सुका यांनी सुरुवातीला लाकूड बारीक करून त्याची पेस्ट बनवली.



या पेस्टमध्ये एंजाइम आणि यीस्ट टाकून फर्मंटेशन केलं जातं. त्यानंतर एक द्रव प्राप्त तयाका होतो, ज्यामध्ये 15 टक्के अल्कोहोल असते.



साध्या भाषेत 3.75 टक्के अल्कोहोल एका लिटर द्रवात तयार होते. आता जपानमध्येही लाकडापासून दारू बनवली जात आहे.