खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारची गणना बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या यादीत केली जाते. अक्षय कुमार सध्या 'सेल्फी' या सिनेमामुळे चर्चेत आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारने कॅनडाचं नागरिकत्व सोडणार असल्यावर भाष्य केलं आहे. अक्षय कुमारचं नागरिकत्व कॅनडाचं असल्याने त्याला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. अक्षयने कॅनडाचं नागरिकत्व सोडणार असल्याचं वक्तव्य करत टिकाकारांची बोलती बंद केली आहे. आज तकला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमार म्हणाला, भारत माझ्यासाठी सर्वकाही आहे. अक्षय कुमार पुढे म्हणाला, माझ्याकडे कॅनडाचं नागरिकत्व असल्याने अनेकांनी मला ट्रोल केलं आहे अक्षय म्हणाला,माझ्याकडे कॅनडाचा पोसपोर्ट आहे हे मी विसरलो होतो. पण आता मी पासपोर्ट बदलण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. अक्षयचा 'बडे मिया छोटे मिया' हा सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खिलाडी कुमारने आता परेश रावल आणि सुनील शेट्टीसह 'हेरा फेरी 3'च्या शूटिंगलादेखील सुरुवात केली आहे.