लोकप्रिय अमेरिकन गायिका सेलेना गोमेजचं नाव सध्या जगभरात चर्चेत आहे. सेलेनाचा मोठा चाहतावर्ग असून तिचे इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. सेलेना गोमेजचे इंस्टाग्रामवर 38,23,61,901 फॉलोअर्स आहेत. सेलेना पाठोपाठ कायली जेनरचे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. सेलेना गोमेज 'ल्यूपस' या गंभीर आजाराने ग्रस्त आहे. सेलेना गोमेजला गेल्या काही दिवसांपासून बॉडी शेमिंगचा सामना करावा लागत आहे. सेलेना गोमेज अमेरिकन गायिका आहे. गायिका असण्यासोबत ती एक उत्तम अभिनेत्रीदेखील आहे. विजार्ड ऑफ वेवर्ली प्लेस' या मालिकेतील रुसो या भूमिकेमुळे सेलेना घराघरांत पोहोचली आहे. 'सिंड्रेला स्टोरी', 'प्रिंसेस प्रोटेक्शन' या मालिकांमध्येदेखील सेलेनाने काम केलं आहे. 'रमोना अॅन्ड बीजुस' या सिनेमाच्या माध्यमातून सेलेनाने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे.