'मिस्टर इंडिया' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मैत्री झाली. बोनी आणि श्रीदेवी यांच्यात भावा-बहिणीचं नातं आहे असं बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीला वाटत होते. श्रीदेवी गरोदर राहिल्या आणि बोनी कपूरमुळे त्या गरोदर आहेत हे त्यांच्या पहिल्या पत्नीला कळल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. श्रीदेवी गरोदर राहिल्यानंतर बोनी कपूर यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि श्रीदेवींसोबत लग्न केलं. श्रीदेवी यांनी तीन दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. श्रीदेवी यांनी हिंदीसह, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेंतील सिनेमांत काम केलं आहे. श्रीदेवी यांनी वयाच्या चौथ्या वर्षी 'कंधन करुणई' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. श्रीदेवी 1996 साली बोनी कपूरसोबत लग्नबंधनात अडकल्या. श्रीदेवी यांनी अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं असलं तरी 'हिम्महतवाला' या सिनेमाने त्यांना खरी ओळख मिळाली. 80 च्या दशकात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत श्रीवेंची गणना होते.