उर्वशी रौतेलानं परिधान केलेल्या मगरीच्या डिझाइनच्या नेकलेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले
कान्स फिल्म फेस्टिव्हलला 16 मे रोजी सुरुवात झाली आहे.
या फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर बॉलिवूड अभिनेत्रींचा जलवा पहायला मिळत आहे.
यंदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये उर्वशी रौतेलानं देखील हजेरी लावली होती.
कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील इंडियाना जोन्स अँड डायल ऑफ डेस्टिनीच्या स्क्रीनिंगला उर्वशी रौतेलानं हजेरी लावली होती.
त्यामधील एका लूकमध्ये तिनं ऑफ शोल्डर क्रीम अँड ब्लू कलरचा निळा गाऊन परिधान केला होता.
तसेच तिनं डायमंड नेकलेस आणि मॅचिंग कानातले होते.
यावेळी उर्वशीनं लावलेल्या लिपस्टिकनं अनेकांचे लक्ष वेधले.
उर्वशीनं ब्लू कलरची लिपस्टिक लावली होती.
आधी मगरीचा नेकलेस आणि आता निळी लिपस्टिक