दिग्दर्शक अनुराग कश्यपची लेक आलियाने गुपचूप साखरपुडा उरकला आहे.
बॉयफ्रेंडसोबतचा रोमॅंटिक फोटो शेअर करत तिने यासंदर्भात चाहत्यांना माहिती दिली आहे.
आलियाने तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगोइरेसोबत गुपचूप साखरपुडा उरकला आहे.
आलिया गेल्या काही दिवसांपासून शेन ग्रेगोइरेसोबतचे फोटो शेअर करत होती.
आलिया कश्यपने शेनसोबतचा फोटो शेअर करत लिहिलं आहे,माझा जिवलग मित्र, माझा जोडीदार, माझा साथीदार आणि आता माझा होणारा पती... तू माझ्या आयुष्यातील प्रेम आहेस.
आलियाने पुढे लिहिलं आहे,खरं प्रेम काय असतं हे मला दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद... तुला हो म्हणणं ही आतापर्यंत मी केलेली एक चांगली गोष्ट आहे. तुझ्यासोबत आता उर्वरित आयुष्य घालवण्याची मी प्रतीक्षा करू शकत नाही. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.
आलिया कश्यपने सोशल मीडियावर शेनसोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
आलिया कश्यप आणि सेनची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
आलिया आणि सेनचा साखरपुडा बालीमध्ये झाला आहे.
आलिया कश्यपने वयाच्या 22 व्या वर्षीच साखरपुडा केला आहे.