कान्स चित्रपट महोत्सवात कलाविश्वातील अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावतात.


ऐश्वर्या राय बच्चन हिनेही कान्स चित्रपट महोत्सवात हजेरी लावली होती.


ऐश्वर्या राय बच्चनचा रेड कार्पेटवरील लूक समोर आला आहे.


कान्सच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्याने एण्ट्री करताच तिच्यावरच साऱ्यांच्या नजरा खिळल्या.


ऐश्वर्याने काळ्या रंगाचा फ्लोरल आणि रफल गाऊन परिधान केला आहे.


ऐश्वर्याने या गाऊनवर फक्त चंदेरी रंगाचे आकर्षक कानातले घालणं पसंत केलं.


ऐश्वर्याच्या रेड कार्पेट लूकसमोर इतर अभिनेत्रीही फिक्या वाटत होत्या.


यंदाच्या तिच्या रेड कार्पेट लूकने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे.


ऐश्वर्याने २००२मध्ये पहिल्यांदाच कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली होती.