सर्वात जास्त दुध देणाऱ्या म्हशींमध्ये मुर्रा जातीच्या म्हशींचा प्रथम क्रमांक लागतो. इतर जातीच्या म्हशींच्या तुलनेत मुर्रा जातीच्या म्हशी दुध जास्त देतात.
अनेक लोकांना मुर्रा जातीच्या म्हशी कोणत्या हे समजत नाही. ते नेमकं कसं ओळखायचं असा प्रश्न पडतो.
मुर्रा जातीच्या म्हशींची डोके आणि शेपटीवरील केस हे सोनेरी आकाराचे असतात. मुर्रा जातीच्या म्हशींच्या शेपटी ही इतर जातीच्या म्हशींच्या तुलनेत लांब असते.
मुर्रा जातीच्या म्हशींची शिंगांचा आकार छोटा असतो. तसेच शिंगाना थोडा बाक असतो.
मर्रा जातीच्या म्हैशी इतर म्हशींच्या तुलनेत दुध जास्त देतात. वर्षभरात या जातीच्या म्हैशी साधारणत 2 ते 3 हजार लीटर दूध देतात.
मुर्रा जातीच्या म्हशींचा कलर हा पूर्णपणे काळाकुट्ट असतो.
भारतातील सर्व भागात मुर्रा जातीच्या म्हशी आढळतात. विशेषत: हरियाणा, दिल्ली आणि पंजाब मधील रोहतक, हिसार, जिंन्द आणि करनाल या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मुर्रा जातीच्या म्हशी आढळतात.
मूर्रा म्हशी ची किंमत 40 ते 80 हजार रुपये असते. ही म्हैस दररोज 10 ते 12 लिटर दूध देऊ शकतात.