राज्यातील विविध प्रयोग करुन पीक उत्पादकतेत वाढ करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे बक्षीस मिळणार आहे.
शेतकऱ्यांना ३१ जूलैपर्यंत या स्पर्धेसाठी अर्ज करता येणार आहे.
ही स्पर्धा तालुका स्तरीय होणार असून यामध्ये आदिवासीय गटाला सुद्धा सहभागी होता येणार आहे.
मूग आणि उडीद पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै.
तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमुग, व सुर्यफूल या पिकांसाठी ३१ ऑगस्ट.
प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र शुल्क असून सर्वसाधारण शेतकऱ्याला ३०० रुपये तर आदिवासी गटासाठी १५० रुपये प्रवेश शुल्क आहे.
-स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याकडे स्वत:ची जमीन असणे आवश्यक असून ती तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे.
-एकापेक्षा अधिक पिकांसाठीही शेतकऱ्याला स्पर्धेत भाग घेता येतो.
सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्याला भात पीक किमान २० आर तर
इतर पिकांच्या बाबतीत १ एकर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्याला विहित नमुना अर्ज, प्रवेश शुल्क, सातबारा व ८-अ चा उतारा देणे आवश्यक आहे.
आदिवासी शेतकऱ्याला जात प्रमाणपत्र देणे आवश्यक
पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याला सातबाऱ्यावर घोषीत केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकीत नकाशा, बँक खाते, चेक, किंवा पासबूकच्या पहिल्या पानाची प्रत देणे आवश्यक आहे.
तालुका पातळीवर पहिले बक्षीस ५ हजार रुपये दुसरे ३ हजार रुपये तर तिसरे बक्षीस २ हजार रुपयांचे आहे.
जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस १० हजार, दुसरे ७ हजार तर तिसरे बक्षीस ५ हजारांचे आहे.
राज्य पातळीवर पहिले बक्षीस ५० हजार रुपयांचे असून दुसरे ४० हजार तर तिसरे बक्षीस ३़० हजार रुपयांचे आहे.