नाफेडच्या माध्यमातून होणाऱ्या हरभरा खरेदीच्या नोंदणीस 31 मार्चपर्यंतची मुदतवाढ



सुरुवातीला हरभरा खरेदीच्या नोंदणीस 15 मार्चपर्यंतची मुदत देण्यात होती.



मात्र, शेतकऱ्यांनी मुदत वाढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या या मागणीला अखेर यश आलं आहे.



मुदतवाढीमुळे नाफेडमध्ये हरभरा विकणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा



बुलढाणा जिल्ह्यातील हरभरा खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याचीही मागणी



गेल्या वर्षी बुलढाणा जिल्ह्यात 75 हरभरा खरेदी केंद्र होती.



परंतु यावर्षी अद्याप फक्त 24 हरभरा खरेदी केंद्र चालू आहेत.



राज्यात एकूण 29 लाख 20 हजार हेक्टरवर हरभरा पिकाची लागवड



यंदा हरभरा पिकासाठी वातावरण देखील चांगले असल्यानं उत्पादनही चांगले



हरभऱ्याचा हमीभाव हा 5 हजार 335 रुपये इतका आहे.



सध्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1 हजार रुपये आर्थिक नुकसान होत आहे.