बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.आदिती उत्तम अभिनेत्रीसह उत्तम गायिकाही आहे.



आदिती अगदी कमी मेकअप करते किंवा कधी कधी करतही नाही, मेकअप शिवायही तिची सुंदरता तिळमात्र कमी होत नाही.



आदितीच्या नव्या फोटोंमध्ये ती काळ्या रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये दिसत आहे.



या लूकमध्ये आदितीचा रॉयल अंदाज पाहायला मिळत आहे.



आदितीनं ब्लॅक अन्ड व्हाईट प्रिटेंड ड्रेसला मॅचिंग बेल्ट आणि हेवी इअररिंग्सची जोड दिली आहे.



आदिती आगामी मैदान, स्त्री 2 आणि एक विलन रिटर्न्स सारख्या अनेक चित्रपटांमध्ये झळकणार आहे.



आदिती याआधी पद्मावत चित्रपटामध्ये झळकली होती.



आदिती राव हैदरी 'हे सिनामिका' आणि 'महासमुद्रम' यांसारख्या दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकणार आहे.



आदिती 2011मध्ये आलेल्या 'ये साली जिंदगी' या बॉलिवूड चित्रपटातून लाइमलाइटमध्ये आली.



अदितीचं इन्स्टाग्राम प्रोफाइल पाहून तिला फॅशन सेन्सची योग्य जाण असल्याचं लक्षात येतं.



आदितीच्या फोटोंवर चाहते नेहमीच लाईक्सचा वर्षाव करत असतात.