मधुमेहाच्या रुग्णांसाठी फणसाचे सेवन फायदेशीर मानले जाते.



फणसाच्या बियांमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात आणि त्यात विरघळणारे फायबरचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत होते.



रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरते.



कच्च्या फणसामध्ये पिकलेल्या फणसापेक्षा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत होते.



याशिवाय अपचनाच्या समस्येत फणसाच्या बियांची पावडर त्वरित आराम देते.



बद्धकोष्ठतेच्या समस्येमध्ये, फणसाच्या बिया थेट खाल्ल्या जाऊ शकतात कारण, त्यात आहारातील फायबर भरपूर प्रमाणात असते.



जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि नियमित औषधांसोबत कच्च्या फणसाचा आहारात समावेश करत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आहारात त्याचा समावेश करा.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.