अभिनेत्री सारा अली खान अलीकडे सोशल मीडियावर तुफान अॅक्टिव्ह असते. ती कायम नवनवीन फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आताही तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ इस्तंबूलमधील आहे. यामध्ये ती फोटोशूट करत असावी असं दिसून येत. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट करत तिने त्याबाबतची सर्व माहितीही लिहिली आहे. हा व्हिडीओ इस्तंबूलच्या Çiragan Palace Kempinski येथील आहे. अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा विविध चित्रपटात झळकली आहे. अभिनेत्री सारा अली खान सध्या बॉलीवुडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. सारा तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.