इंग्लंडशी रिशेड्यूल कसोटी सामना खेळण्यासाठी भारतीय संघातील बहुतेक खेळाडू इंग्लंडमध्ये पोहचले आहेत.



मात्र, या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का लागलाय.



भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला कोरोनाचा संर्सग झाला आहे.



याबाबत बीसीसीआयच्या एका सूत्रानं पीटीआयला माहिती दिली.



आश्विन हा सध्या क्वारंटाईन आहे आणि अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच तो इंग्लंडला जाऊ शकेल, अशीही माहिती समोर येत आहे.



भारतीय संघ गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी कोरोना महामारीमुळं या मालिकेतील अखेरचा सामना पुढे ढकलण्यात आला.



हाच सामना खेळण्यासाठी भारतीच संघ इंग्लंडशी भिडणार आहे. या मालिकेतील भारतीय संघ 2-1 नं आघाडीवर आहे.



या मालिकेतील अखेरचा सामना जिंकून भारतीय संघ इतिहास रचण्यासाठी सज्ज झालाय.



भारताचा माजी क्रिकेटपूट राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतानं 2007 मध्ये इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिका जिंकली होती.