अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांना गेल्या वर्षी कन्यारत्न प्राप्त झालं.



अनुष्का आणि विराटनं त्यांच्या मुलीचे नाव वामिका असं ठेवलं.



अनुष्का आणि विराट हे सोशल मीडियावर वामिकाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.



विराट आणि अनुष्कानं वामिकाचा चेहरा सोशल मीडियावर न दाखवण्याचा निर्णय घेतला.







एका मुलाखतीमध्ये अनुष्कानं वामिकाला स्पॉटलाईटपासून दूर ठेवण्याचं कारण सांगितलं होतं.



एका मुलाखतीमध्ये अनुष्का म्हणाली, 'आम्ही याचा खूप विचार केला आहे. आम्ही आमच्या मुलीला लोकांच्या नजरेत राहावं, असं वाढवणार नाही. तिने सोशल मीडियामध्ये गुंतून रहावं, असं आम्हाला वाटत नाही.'



'कोणत्याही मुलाला इतरांपेक्षा खास करु नये. हे करणं कठिण आहे पण आम्ही हा नियम फॉलो करण्याचा प्रयत्न करत आहोत.'असंही अनुष्कानं सांगितलं.



2017 मध्ये अनुष्कानं क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली.



2021 मध्ये 11 जानेवारी रोजी मुलगी वामिकाला जन्म दिला.