सध्या भारतीय संघ इग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत इंग्लडशी रिशेड्युल केलेला एकमेव कसोटी सामना खेळणार आहे.
हा सामना जिंकून भारतीय संघ इतिहास रचण्यासाठी सज्ज झालाय.
भारताचा माजी क्रिकेटपूट राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतानं 2007 मध्ये इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिका जिंकली होती.
दरम्यान, भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा खराब फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
तर, इग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स ॲंडरसन उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. नुकतंच ॲंडरसननं त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 650 विकेट्सचा टप्पा गाठलाय.
या सामन्यात विराट कोहलीकडं मोठी जबाबदारी असणार आहे. कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरतो. अशा स्थितीत संघासाठी धावा करणं त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं असेल.
विराट कोहलीनं नोव्हेंबर 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचे शतक झळकावलं होतं.
जेम्स ॲंडरसन सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. महत्वाचं म्हणजे, त्याच्या गोलंदाजीसमोर विराट कोहली नेहमी संघर्ष करताना दिसलाय.
विराट कोहली गेल्या दोन-तीन वर्षात एकसाखराच फटका खेळताना बाद झाल्याचं पाहायला मिळालंय.
आयपीएलमध्ये अनेक विक्रमाला गवसणी घालणाऱ्या विराट कोहलीसाठी आयपीएलचा पंधरावा हंगाम अतिशय खराब ठरलाय.
या हंगामात त्यानं तीन वेळा गोल्डन डकचा शिकार ठरलाय. रॉयल चॅलेंजर्सकडून खेळताना त्यानं 16 सामन्यात 22.73 च्या सरासरीनं 341 धावा केल्या. ज्यात फक्त दोन अर्धशतकांचा समावेश आहे.