छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री, ‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया नुकतेच आई-बाबा झाले असून सध्या ते त्यांच्या लाडक्या लेकासोबत म्हणजेच 'लक्ष्य' सोबत वेळ घालवत आहेत. मुलाबाबतचे सर्व अपडेट्स ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. आता भारती आणि हर्षने लेकाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. भारती सिंहचे स्वत:चे यूट्यूब चॅनल आहे. यावर ती अनेक व्हिडीओ शेअर करत असते. आता एक खास व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत तिने लाडक्या लेकाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. भारती सिंह तिच्या मुलाला प्रेमाने गोला म्हणते. त्यामुळे तिने 'गोलाची झलक पाहा' असे म्हणत यूट्यूबवर व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचसोबत भारतीने इंस्टाग्रामवर मुलासोबतच्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.