अभिनेत्री राधिका आपटेनं नुकताच एक बीचवरील फोटो पोस्ट केला आहे. हाच तो फोटो असून यावर चाहत्यांकजून लाईक्स-कमेंट्सता पाऊस पाडला जात आहे. राधिका सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह नसली तरी फोटो पोस्ट करत असते. तिच्या फोटोवर चाहतेही भरभरुन प्रेम करतात. वेगवेगळ्या आउटफीटमध्ये ती फोटो काढत असते. तिचे फोटोज अनेकदा हटके असतात. दरम्यान मागील बरेच दिवस ती कोणत्या चित्रपटात झळकलेली नाही. बऱ्याच वेबसिरीज गाजवणाऱ्या राधिकाची अलीकडे कोणती वेबसीरीजही आलेली नाही. तिच्या आगामी प्रोजेक्टची चाहते वाट पाहत आहेत.