व्हॅलेंटाईन वीकमधील तिसरा दिवस म्हणजे नात्यातला गोडवा वाढवणारा....चॉकलेट डे
प्रेमाचं नातं हे चॉकलेटप्रमाणे असावं, अगदी गोड...असंच सर्वांना वाटत असतं
म्हणून आजचा दिवस म्हणजे 9 फेब्रुवारी हा चॉकलेट डे म्हणून साजरा करण्यात येतो
प्रेमात पडलेल्या आणि प्रेमात पडायच्या मार्गावर असलेले अनेकजण व्हॅलेंटाईन वीकमधील 'चॉकलेट डे'ची आतुरतेने वाट पाहत असतात
आपल्या आवडत्या व्यक्तीवर, जोडीदारावर प्रेम व्यक्त करण्यासाठी चॅाकलेटसारखा दुसरा पर्याय नाही
त्यामुळेच व्हॅलेंटाईन वीकमध्ये या दिवसाचं महत्त्व मोठं आहे
आज बाजारात अनेक प्रकारचे चॉकलेटचे प्रकार उपलब्ध आहेत
परंतु डार्क चॉकलेट खाण्याचे अनेक फायदे आहे
जर तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी चॉकलेट घेणार असाल तर डार्क चॉकलेट किंवा ज्यामध्ये कोकोचे प्रमाण जास्त आहे, असे चॉकलेट खरेदी करा आणि आपल्या प्रेमाच्या प्रवासात एक पाऊल पुढे टाका
'रोज डे' आणि 'प्रपोज डे'चा यशस्वी प्रयोग केला असेल तर मग आजच्या 'चॉकलेट डे'ने तुमच्या प्रेमाच्या प्रवासाचा गोडवा वाढवा
जर व्हॅलेंटाईन वीकचे पहिले दोन दिवस वाया गेले असतील तरीही 'चॉकलेट डे'च्या निमित्ताने एक गोड सुरुवात करा