काजू खाण्यात जेवढे चविष्ट आहे, तेवढेच ते अधिक फायदेशीर आहेत रोज काजू खाल्ल्याने हाडे, केस, त्वचा, मधुमेह आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. मुलांसाठीही काजू फायदेशीर आहे काजूमध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात काजू लोह, फायबर, फोलेट, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सेलेनियम आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे काजू हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जाते काजूमध्ये आढळणारे पौष्टिक घटक त्वचेसाठी आणि केसांसाठीही खूप चांगले असतात काजू खाल्ल्याने हाडे मजबूत होतात काजूमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात आढळतात, जे हाडांना कमकुवत होण्यापासून वाचवतात हाडांच्या समस्येने त्रस्त असलेल्यांनी रोज काजू खावेत टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.