बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या 'तेजस' या सिनेमामुळे चर्चेत आहे.

या सिनेमात ती वैमानिक तेजस गिल यांच्या भूमिकेत झळकली आहे.

या सिनेमातील कंगनाच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

आता 'तेजस' या सिनेमानंतर कंगनाचा 'तनु वेड्स मनु 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पंगाक्वीन लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

आयएमडीबीला दिलेल्या मुलाखतीत कंगना रनौतने तिच्या आगामी सिनेमांबद्दल भाष्य केलं आहे.

'तेजस' या सिनेमानंतर कंगना विजय सेतुपतीसह एका थरार सिनेमात झळकणार आहे.

'तनु वेड्स मनु' हा सिनेमा 2011 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

या सिनेमाचा दुसरा भाग अर्थात 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' हा सिनेमा 2015 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

कंगनाचा इमर्जन्सी हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. हा सिनेमा 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.