अभिनेत्री जान्हवी कपूर अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने बातम्यांचा भाग असते. जान्हवी आता पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यावरून लोकांना नजर हटवणे कठीण झाले आहे. यामध्ये तीने फ्लॉवर प्रिंट हाय थाई स्लिट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी जान्हवीने हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस खुले ठेवले आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूरकडे सध्या चित्रपटांची खूप मोठी लाईन आहे. जान्हवी कपूर लवकरच 'रणभूमी', 'तख्त', 'गुड लक जेरी', 'मिस्टर अँड मिसेस माही' आणि 'बावल'मध्ये दिसणार आहे. (Photo:/janhvikapoor/IG) (Photo:/janhvikapoor/IG) (Photo:/janhvikapoor/IG)