बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) आज (9 जून) तिचा 37वा वाढदिवस साजरा करत आहे.



सध्या सोनम कपूर प्रेग्नंट आहे आणि अशा परिस्थितीत तिचा वाढदिवस आणखी खास असणार आहे.



सोनमला तिच्या वाढदिवसाची उत्सुकता खूप आधीपासून लागली होती.



तिने पती आनंद आहुजासोबतचा एक रोमँटिक व्हिडीओ शेअर करून वाढदिवसाच्या आठवड्याची सुरुवात केल्याचा आनंद शेअर केला होता.



बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सोनम तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्स आणि स्टाईल स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध आहे.



फॅशनला नवी व्याख्या देणारी सोनम अनेकदा तिच्या लूकवर वेगवेगळे प्रयोग करत असते.



अभिनेत्रीच्या रेड कार्पेट लूकपासून ते रोजच्या लूक्सपर्यंत सारंकाही नेहमीच चर्चेत असतं.



एक काळ असा होता की, सोनम खूप लठ्ठ होती. कॉलेजच्या दिवसांमध्ये लठ्ठपणामुळे लोक अनेकदा तिची खिल्ली उडवत असत.



सोनम 15 ते 20 वयात असताना पीसीओओएस आजाराशी झुंज देत होती, त्यामुळे तिचे वजन झपाट्याने वाढत होते.



आता स्टाईल आणि फॅशनच्या बाबतीत सोनम कपूर अग्रक्रमी आहे.