बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल आज आपला 46वा वाढदिवस साजरा करत आहे.



9 जून 1976 रोजी मुंबईत गुजराती कुटुंबात जन्मलेल्या अमीषाने 2000मध्ये 'कहो ना प्यार है' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.



हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला होता. 2001मध्ये आलेला तिचा 'गदर' हा चित्रपटही सुपरहिट ठरला.



अमीषा पटेलने तिच्या आजवरच्या कारकिर्दीत 40हून अधिक चित्रपट केले आहेत. मात्र, तिच्या कारकिर्दीचा आलेख सतत घसरत राहिला.



अमीषाला या 'कहो ना प्यार है' चित्रपटात तिच्या वडिलांमुळे भूमिका मिळाली होती.



या चित्रपटाच्या यशानंतर 2001 साली आलेल्या 'गदर' चित्रपटातून खऱ्या अर्थाने तिला प्रसिद्धी मिळाली.



या चित्रपटात सनी देओलसोबत अमीषाने उत्तम काम केले होते. या चित्रपटासाठी अमीषाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.



2002 मध्ये अमिषाने बॉबी देओलसोबत 'हमराज' चित्रपटात काम केले होते.



हा चित्रपटही सुपरहिट ठरला होता. तीन वर्षात सलग तीन हिट चित्रपट देऊनही अमीषाचे करिअर मात्र उतरणीला लागले.



अमीषाने 2005 मध्ये आमिर खानसोबत 'मंगल पांडे' चित्रपटात काम केले होते.



ती शेवटची ‘भैयाजी सुपरहिट’ या चित्रपटात दिसली होती. याशिवाय ‘बिग बॉस’च्या 13व्या सीझनमध्ये ती दिसली होती.