टेलिव्हिजन अभिनेत्री दिशा परमार आजकाल लग्नानंतर पती राहुल वैद्यसोबत तिच्या आनंदी वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. दिशाने नुकतेच तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. नव्या फोटोंमध्ये दिशा परमारने पंजाबी सूट परिधान करून बागेत फोटोशूट केले आहे. अभिनेत्रीच्या या साध्या स्टाईलनेही चाहत्यांची मनं घायाळ झाली आहेत. दिशाचे हे फोटो पाहून तिचे चाहते अभिनेत्रीचं तोंडभरून कौतुक करत आहेत. पिवळ्या सूटमधील दिशाच्या या फोटोंवरून नजर हटवणे सगळ्यांनाच अवघड जात आहे. चाहत्यांसोबतच सर्व सेलिब्रिटी देखील अभिनेत्रीच्या या लूकचे कौतुक करत आहेत. दिशा परमारने गायक राहुल वैद्यसोबत लग्न केले आहे आणि हे जोडपे एकमेकांसोबत त्यांचे वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहेत.