टीव्हीची ‘लाफ्टर क्वीन’ कॉमेडियन-अभिनेत्री भारती सिंह (Bharti Singh) आज (3 जुलै) आपला वाढदिवस साजरा करत आहे.



पंजाबमधील अमृतसर येथे जन्मलेल्या भारती सिंहचे यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले.



तिच्या आईवडिलांनी तर तिला गर्भातच मारण्याचा निर्णय घेतला होता.



एवढेच नाही, तर जेव्हा भारती सिंहने कॉमेडियन बनण्याचा निर्णय घेतला, तेव्हा देखील तिच्या कुटुंबीयांनी तिच्यावर बहिष्कार टाकला होता.



भारती सिंह नेहमीच तिच्या चाहत्यांना हसवण्यात यशस्वी ठरते.



‘लाफ्टर क्वीन’ म्हणून टीव्ही विश्वावर राज्य करणाऱ्या भारती सिंहचे बालपण अत्यंत गरिबीत गेले.



भारतीचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. भारती दोन वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले.



तीन भावंडांमध्ये भारती सर्वात लहान होती. मात्र, गरिबीमुळे भारतीला लहानपणापासूनच नोकरी करावी लागली.



भारतीच्या आईने तिला आणि तिच्या भावंडांना कष्ट करायला शिकवले होते.