अभिनेत्री अवनीत कौर लवकरच आपला बॉलिवूड डेब्यू करण्याच्या तयारीत आहे. बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत अवनीत कौर पदार्पण करणार आहे. बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची ऑनस्क्रिन गर्लफ्रेंड अवनीत कौरनं आपला चित्रपट रिलीज होण्यापूर्वी आपला लूक चेंज केला आहे. अनवीनं स्वतः आपल्या नव्या लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. अवनीतनं नवा हेअर कट केला आहे. आपल्या नव्या लूकचे फोटो तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. नव्या हेअर कटमध्ये ती क्लासी दिसतेय. फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, अवनीतनं आपले केसे शॉर्ट आणि स्ट्रेट केले आहेत. अवनीनं ब्ल्यू ड्रेस वेअर केला आहे. या फोटोंमध्ये ती हॉट अॅन्ड सेक्सी दिसत आहे. अवनीतच्या आगामी चित्रपटाबाबत बोलायचं झालं तर, अवनीत, कंगना रानौत आणि नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत 'टीकू वेड्स शेरू' मध्ये दिसून येणार आहे.