छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मालिकेतील सगळीच पात्र प्रेक्षकांच्या मनाला भावतात. अरुंधती आणि तिचं कुटुंब आता प्रेक्षकांच्या कुटुंबात सामील झालं आहे. या मालिकेतील देशमुखांची लाडकी लेक ‘ईशा’ सगळ्यांनाच आपल्या घरातील एक वाटते. अभिनेत्री अपूर्वा गोरे हिने मालिकेत ‘ईशा’चे पात्र साकारले आहे. अपूर्वा गोरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. नुकतेच अभिनेत्रीने तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo : @apurvagore/IG)