केंद्र सरकारने मुलींच्या विवाहाचं वय हे 18 वरुन 21 वर नेण्याचा निर्णय घेतला आहे.

आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

विवाहासाठी मुलींचे किमान वय 18 वरून 21 वर्ष करणारं विधेयक सरकार याच अधिवेशनात आणणार आहे.

गुरुवारी केंद्रीय कॅबिनेटने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानदेखील लग्नाचे वय 18 वरून 21 वर्ष करण्याच्या सरकारच्या प्रस्तावाचं समर्थन केलं आहे.

जरीन खान म्हणाली,लग्नाचे वय वाढवण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे.

प्रत्येक मुलीला लग्न केव्हा करायचे हे स्वतः ठरवण्याचा अधिकार असायला हवा.

माझं वय 35 आहे. पण अद्याप माझे लग्न झालेले नाही.