सैराट फेम अभिनेता आकाश ठोसरने नुकतीच एका गडाला भेट दिली. हा गड म्हणजे प्रसिद्ध राजगड आकाशने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आकाश किल्ले रायगडाचं दर्शन घेताना दिसून येत आहे. फोटोंना खास कॅप्शनही दिले आहे. आकाशने लिहिलंय,''सह्याद्रीचं सुख हे शब्दांत मांडता येत नाही, तर ते प्रत्यक्षातच अनुभवावं लागतं'. राजगडाचे फोटोही शेअर केले आहेत. त्याला ''गडांचा राजा, राजियांचा गड... किल्ले राजगड'', असं कॅप्शन या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. आकाश फोटोमध्ये अगदी सिंपल लूकमध्ये दिसत आहे.