शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानचे चाहते त्याला कधीच पडद्यावर अभिनय करताना बघू शकणार नाहीत. कारण शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अभिनेता होणार नाही आर्यन खानने अभिनयाला आपले करिअर म्हणून निवडले नाही, तर रायटिंगची निवड केली आहे. आर्यन लवकरच एका वेब सीरिजमधून लेखक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आर्यन वेब सीरिज आणि चित्रपटांसाठी स्क्रिप्ट रायटिंगवर लक्ष केंद्रित करत आहे. ज्याची निर्मिती त्याचे वडील शाहरुखच्या रेड चिलीज एंटरटेन्मेंटद्वारे केली जाणार आहे.