ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आरोन फिंचनं घेतली निवृत्ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानकपणे जाहीर केली निवृत्ती मागील वर्षीच त्याने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला होता पण आता त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे ऑस्ट्रेलियाचा एक यशस्वी कर्णधार म्हणून फिंचला ओळखलं जातं. फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने 2021 साली पहिल्यांदाच T20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर, कांगारू संघाने 2015 मध्ये एकदिवसीय विश्वचषकही जिंकला. आक्रमक फलंदाज असलेल्या फिंचने आपल्या 12 वर्षांच्या कारकिर्दीत केवळ 5 कसोटी सामने खेळले आहेत. फिंचने निवृत्तीबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मला हे जाणवत आहे की मी 2024 साली होणाऱ्या टी-20 विश्वचषकात खेळू शकणार नाही. अशा परिस्थितीत माझ्यासाठी निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे.