आई कुठे काय करते या मालिकेमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांनी नुकतेच त्यांचे खास फोटो शेअर केले आहेत. फोटोंना मधुराणी यांनी कॅप्शन दिले, 'आह को चाहिए इक उम्र असर होते तक, कौन जीता है तिरी ज़ुल्फ़ के सर होते तक' गुलाबी रंगाचा ड्रेस, चंदेरी रंगाचे कानातले आणि गळ्यात चैन अशा लूकमधील फोटो मधुराणी यांनी शेअर केले आहेत. मधुराणी या 'आई कुठे काय करते' या मालिकेमध्ये अरूंधती ही भूमिका साकारतात. वेगवेगळ्या लूकमधील फोटो मधुराणी या सोशल मीडियावर नेहमी शेअर करतात. मधुराणी यांच्या सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत असते. 'आई कुठे काय करते' या मालिकेतील मधुराणी यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.