छोट्या पडद्यावर सध्या 'आई कुठे काय करते' ही मालिका तुफान गाजत आहे. अभिनेत्री रुपाली भोसले 'आई कुठे काय करते' या मालिकेत संजनाची भूमिका साकारत आहे. रुपाली ही मराठी चित्रपटसृष्टीतली ग्लॅमरस आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रुपाली सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच रुपालीने फोटोशूट केलं असून हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. रुपालीच्या या खास फोटोशूटला सोशल मीडियावर चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. तिच्या फोटोवरती लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस होत आहे.