बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राची लोकप्रियता जगभरात आहे. प्रियांकाने हॉलिवूडमध्येदेखील आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. प्रियांका चोप्राची 'सिटाडेल' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सिटाडेल'च्या प्रमोशनदरम्या प्रियांका म्हणाली,बॉलिवूडमध्ये चांगलं काम केल्यानंतरही मला वाळीत टाकलं जात होतं. प्रियांका पुढे म्हणाली,बॉलिवूडमधील राजकारणाचा मला कंटाळा आला होता. हॉलिवूडमध्ये 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राचा चांगलाच दबदबा आहे. 'सिटाडेल' आणि 'लव्ह अगेन'च्या माध्यमातून प्रियांका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आतापर्यंत हॉलिवूडच्या अनेक सिनेमांत प्रियांकाने काम केलं आहे. फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या सिनेमात प्रियांका कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहे. प्रियांका सध्या 'सिटाडेल' या वेबसीरिजचं जोरदार प्रमोशन करत आहे.