बिग बँग थिअरी या प्रसिद्ध शोमधील एका एपिसोडमध्ये माधुरी दीक्षितबाबत
आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप राजकीय विश्लेषक मिथुन विजय कुमार यांनी केला आहे.
या प्रकरणी मिथुन विजय कुमार यांनी नेटफ्लिक्सला नोटीस पाठवली आहे.
ही नोटीस पाठवून मिथुन विजय कुमार यांनी स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवरुन या शोमधील एक एपिसोड हटवण्याची मागणी केली आहे
बिग बँग थिअरीच्या दुसऱ्या सिझनमधील पहिल्या एपिसोडमध्ये जिम पार्सन्स यानं शेल्डम कूपर ही भूमिका साकारली आहे.
जिम पार्सन्स हा शोमध्ये माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांची तुलना करतो. त्यानंतर तो माधुरीबाबत एक कमेंट करतो.
या कमेंटवर आता मिथुन विजय कुमार यांनी आक्षेप घेतला आहे.
मिथुन विजय कुमार यांनी एक ट्वीट शेअर केलं आहे.
मी लहानपणापासूनच माधुरी दीक्षित यांचा फॅन आहे. त्यामुळे बिग बँग थिअरीमधील तो डायलॉग ऐकून मला वाईट वाटलं
मिथुन विजय कुमार यांच्या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले. आता नेटफ्लिक्स या प्रकरणी काय कारवाई करेल? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.