प्राजक्ता माळी तिच्या सुंदर लुकने नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेते. प्राजक्ताने वाईन रंगाच्या साडीमध्ये काही फोटो शेअर केले आहे. मुझे इश्क़ है इश्क़ से…इस दर्द से इश्क़ है। अशी कॅप्शन तिने फोटोंना दिली आहे. वाईन रंगाच्या साडीमध्ये प्राजक्ताचे सौंदर्य खुलून दिसले आहे. प्राजक्ताच्या या ग्लॅमरस लूकवर चाहते फिदा झाले आहेत. वाईन रंगाच्या साडीवर वेलवेट डिपनेक नेकलाईन ब्लाऊज परिधान केला आहे. हातामध्ये काळ्या रंगाचे ब्रेसलेट, काळ्या रंगाचे इयर रिंग प्राजक्ताने कॅरी केले. प्राजक्ताने केस मोकळे ठेवत हा ग्लॅमरस लूक पूर्ण केला. प्राजक्ताच्या या लूकवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तिच्या ग्लॅमरस लूकने सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे.