बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा जगभरात चर्चेत आहे. शाहरुख खानच्या 'पठाण'ने रिलीजच्या तीन दिवसांत 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. 'पठाण'च्या माध्यमातून शाहरुखने रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं असून लाडक्या सेलिब्रिटीचा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांची पाऊले सिनेमागृहाकडे वळत आहेत. 'पठाण' हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी 'पठाण'ने 55 कोटींची कमाई करत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. दुसऱ्या दिवशी 68 कोटींची कमाई केली. तर आता रिलीजच्या तिसऱ्या दिवशी या सिनेमाने पहिल्या दोन दिवसांपेक्षा कमी कमाई केली आहे. 'पठाण'ने तिसऱ्या दिवशी फक्त 35 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या तीन दिवसांत पठाणने 158 कोटींचा गल्ला जमवला आहे. जगभरात 'पठाण' हा सिनेमा 8000 पेक्षा अधिक स्क्रिन्सवर रिलीज झाला आहे. शाहरुखच्या 'पठाण' लवकरच 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल.