अजय देवगणच्या 'तान्हाजी' या सिनेमाने 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' सोहळ्यात बाजी मारली आहे.

या सिनेमाला लोकप्रिय हिंदी सिनेमाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अजय देवगणला जाहीर झाला आहे.

तान्हाजी' सिनेमाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार पटकावले आहेत.

या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मराठमोळ्या ओम राऊतने सांभाळली होती.

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ओम राऊत आनंद व्यक्त करत म्हणाला,'तान्हाजी' या सिनेमाला दोन पुरस्कार जाहीर झाल्याचा खूप आनंद होत आहे.

आपल्या सिनेमाला पुरस्कार मिळणं हे खूप अभिमानास्पद आहे. शिवरांच्या मावळ्याची गाथा रुपेरी पडद्यावर मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला.

बॉक्स ऑफिसवरदेखील या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला.

हा सिनेमा देशभरातील सिनेरसिकांच्या पसंतीस उतरला होता.