68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात आज चित्रपटसृष्टीशी निगडीत कलाकारांचा गौरव करण्यात आला.

दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये हा सोहळा पार पडला.

यामध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली.

यावेळी हिंदी आणि तमिळ भाषेतील दोन कलाकारांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

साऊथ सिनेमाचा सुपरस्टार सुर्या शिवकुमारला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणनेही हा पुरस्कार पटकावला आहे.

2020 मध्ये बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'सूरराई पोत्रू' या चित्रपटासाठी सुर्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.

सुर्या दक्षिण चित्रपटसृष्टीतील सिंघम आहे.

सुर्या तमिळ अभिनेते शिवकुमार यांचा मुलगा आहे.

सुर्याचा भाऊ कार्तीही साऊथच्या चित्रपटांमध्ये काम करतो.