जगाला पहिला संगणक 1940 मध्ये मिळाला.



भारताने 1956 मध्ये पहिला संगणक विकत घेतला.



तेव्हा त्याची किंमत ₹10 लाख होती आणि त्याचे नाव Hec2m होते.



भारतातील पहिला संगणक कोलकात्याच्या इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये बसवण्यात आला.



त्यावेळचा संगणक खूप मोठा होता. भारतात सामान्य लोकांना संगणक खूप नंतर उपलब्ध होऊ लागला.



इंटरनॅशनल बिझनेस मशीन (IBM) ने 1975 साली पहिला व्यक्तिगत संगणक तयार केला.



हे एक मायक्रोप्रोसेसर तंत्रज्ञान होते,ज्याने एक लहान आणि तुलनेने स्वस्त संगणक तयार केला,जो कोणालाही घरी किंवा कार्यालयात वापरता येईल.



भारतातील पहिला संगणक ISIJU (Indian Statistical Institute Jadavpur University) 1966 मध्ये विकसित करण्यात आला.



ISIJU संगणक भारतीय सांख्यिकी संस्था आणि कोलकाता जादवपूर विद्यापीठ यांनी संयुक्तपणे विकसित केला.



ISIJU हा ट्रांजिस्टराइज्ड संगणक होता. या संगणकाचा विकास हा भारतीय संगणक तंत्रज्ञानासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता.



वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.