मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे. आज मुंबईत 1781 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईत मंगळवारी 1723 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 64 हजार 003 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका झाला आहे. सध्या मुंबईत 14 हजार 146 रुग्ण आहेत. मुंबईत आढळलेल्या नव्या 1781 रुग्णांमध्ये 1695 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे.