तुम्ही जर रोज व्हिडीओ गेम्स खेळत असाल तर याचा परिणाम थेट तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. मानसिक आणि शारिरीक असे आजार तुम्हाला होऊ शकतात.
मुलांना व्हिडीओ गेम्सचे जग इतके खरे वाटू लागते की, मुलं दिवस-रात्र तेच खेळत राहतात. या नादात त्यांना झोप , भूक याचे काहीच भान राहत नाही.
जास्त प्रमाणात व्हिडीओ गेम्स खेळल्याने डोके आणि डोळेदुखी अशा समस्या जाणवायला लागतात.
व्हिडीओ गेम्स मुलांना खेळू दिले नाहीत तर ते रागीट आणि हट्टी बनू लागतात.
व्हिडीओ गेम्स अति प्रमाणात खेळल्याने मुलं कुटुंबापासून दूर जायला लागते. ते घरात कोणाशीही बोलत नाहीत.
सतत व्हिडीओ गेम्स खेळल्याने मुलांचे वजन मोठ्या प्रमाणात वाढते.
व्हिडीओ गेम्स खेळत असाल तर हे लक्षात घेणे गरजेचे आहे की,यामुळे दृष्टी जाऊ शकते तसेच चष्मा देखील लागू शकतो.
तासनतास व्हिडीओ गेम्स मुलं खेळत असेल तर त्याच थेट परिणाम हा मुलाच्या अभ्यासावर होतो. मुलांचे अभ्यासात मुळीच लक्ष लागत नाही.
व्हिडीओ गेम्स खेळणाऱ्या कम्युनिकेशन करण्यात प्राॅब्लेम यायला लागतो.
तर ही मुले एकट्याच वेळ घालवणे पसंत करतात.