स्पेशल रिपोर्ट : वाशिम : जखमी वानराला ठेचून मारणाऱ्या 'त्या' तिघांना अखेर अटक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जखमी वानराला वानराला बेदम मारहाण करणाऱ्या तिघांना वन विभागाने ताब्यात घेतलं आहे. शनिवारी रात्री उशिरा वन विभागाने ही कारवाई केली आहे. वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना कालच समोर आली होती. कुऱ्हा गावात एका व्यक्तीनं जखमी वानराला लाठीकाठीने बेदम मारहाण करून जीवे मारलं. तसंच या वानराच्या मृत्यूनंतर त्याला झाडाला उलटे टांगून चपलनेही मारहाण केली आणि शिव्याही दिल्या. विशेष म्हणजे या इसमानं या घटनेचा व्हिडीओ चित्रिकरण करून इतर ते व्हाट्सअॅप ग्रुपवर व्हायरल सुद्धा केले. पवन बांगर असं वानराला मारहाण करणाऱ्या इसमाचं नाव असून, त्य़ाच्यावर कारवाईची मागणी होत होती.