Sharad Pawar on PM Narendra Modi : काँग्रेसमुक्त म्हणणाऱ्या मोदींनी किती जागा घटल्या बघावं
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSharad Pawar on PM Narendra Modi : काँग्रेसमुक्त म्हणणाऱ्या मोदींनी किती जागा घटल्या बघावं लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) संपल्यानंतर आता समस्त महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकचे वेध लागले आहे. राजकीय पक्षांनीदेखील या निवडणुकीच्या अनुषंगाने आपली तयारी चालू केली आहे. दुसरीकडे नेतेमंडळींना आपल्या मतदारसंघात लोकांशी गाठीभेटी वाढवल्या आहेत. तर काही नेते तिकीट मिळवण्यासाठी वरिष्ठांची मनधरणी करण्याच्या प्रयत्नात आहेत. काही नेते आपली राजकीय सोय बघून पक्षबदल करण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा या परिस्थितीत कोल्हापुरातील (Kolhapur) राजकीय घडामोडींनीही वेग आला आहे. कोल्हापुरातील अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. येथील अजित पावर यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील (A Y Patil) शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रादीत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. कोल्हापुरात तशा हालचाली सुरू आहेत. ए वाय पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट कोल्हापूर जिल्ह्यात अजित पवार गटाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांनी अलिकडच्या काळात दोन वेळा कोल्हापूरचा दौरा केला. या दोन्ही दौऱ्यांत ए वाय वाटील यांचा सहभाग होता. ए वाय पाटलांच्या भेटीनंतर ते शरद पवार यांच्यासोबत जाण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं जातंय.