बँकॉक : नऊवारी नेसून 13 हजार फुटांवरुन पुण्याच्या शीतल महाजन यांचं स्काय डायव्हिंग
Continues below advertisement
स्काय डायव्हिंग करणाऱ्या अनेक धाडसी व्यक्तींचे व्हिडीओ आतापर्यंत पाहायला मिळाले आहेत. मात्र नऊवारी साडी नेऊन तब्बल 13 हजार फुटांवरुन एका महिलेने उडी मारली. पुण्याच्या शीतल महाजन यांनी ही अभिमानास्पद कामगिरी केली.
थायलंडमधील स्काय डायव्हिंग सेंटरमध्ये 13 हजार फुटांवरुन नऊवारी साडी नेसून शीतल महाजन यांनी स्काय डायव्हिंग केलं.
शीतल महाजन यांनी स्काय डायव्हिंग या साहसी खेळामध्ये आजवर 17 राष्ट्रीय आणि 6 जागतिक विक्रमही रचले आहेत.
महाराष्ट्राची शान असलेल्या पद्मश्री शीतल महाजन यांना मराठी असल्याचा सार्थ अभिमान आहे. मराठी संस्कृतीचं जतन व्हावं आणि मराठी बाणा कायम रहावा यासाठी त्यांनी ही अनोखी कामगिरी केली.