अलिगड: अलिगडमध्ये आपल्या होणाऱ्या सासूसोबत पळून गेलेल्या जावई राहुलच्या कुटुंबानेही त्याचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल कपडे विकायचा. मुलीचे अनेक नातेवाईक राहुलच्या घरी पोहोचले. असे सांगितले जात आहे की, या लोकांनी आतापर्यंत जे काही पैसे खर्च केले आहेत ते परत मागितले आहेत. सासू आपल्या जावयाच्या प्रेमात पडली खरी पण ती तिच्यापेक्षा 11 वर्षांनी लहान आहे, हेही समोर आले आहे. सासू आपल्या जावायासोबत पळून गेल्याने खळबळ उडाली आहे. आपला होणारा जावई राहुलसोबत पळून गेलेल्या सासू अनिता देवीबद्दल लोक वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करत आहेत. दोघांमधील संबंधांवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता असे समोर आले आहे की, सासू ज्या जावयाच्या प्रेमात पडली ती तिच्यापेक्षा 11 वर्षांनी मोठी आहे.
जावयाच्या कुटुंबानेही आता त्याचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल कपडे विकायचा. मुलीचे अनेक नातेवाईक राहुलच्या घरी पोहोचले आहे. मुलीच्या कुटुंबातील या लोकांनी आतापर्यंत जे काही पैसे खर्च केले आहेत ते परत मागितले आहेत. मुलीच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की, त्यांना आता या कुटुंबाशी कोणताही संबंध ठेवायचा नाही. दुसरीकडे, अनिता देवीचे पती जितेंद्र म्हणतात की, जेव्हा-जेव्हा अनिता परत येईल तेव्हा तो तिला नक्कीच विचारेल की तिने असे का केले.
या गोष्टीची सुरूवात झाली ती, एके दिवशी सासूने कुटुंबातील सदस्यांना सांगितले की, तिचा जावई आजारी आहे आणि तिला त्याला भेटायला जायचे आहे. कुटुंबातील सदस्यांना काहीही संशय आला नाही. तिची सासू निघून गेली आणि ती पाच दिवस त्याच्यासोबत एकटीच राहिली.पाच दिवसांनी ती परत आली तेव्हा तिचा जावई तिला सोडायला आला. पण तो तिला घरी घेऊन गेला नाही, तो तिला परिसरातील एका शाळेजवळ सोडून निघून गेला.
घरी लग्नाची मोठी तयारी सुरू होती. 16 एप्रिल रोजी लग्न होतं. कार्ड छापले गेले होते आणि नातेवाईकांना आमंत्रणे पाठवली जात होती. दरम्यान, ज्या घरात मोठी वर्दळ असायला हवी, गाजावाजा असायला हवा त्या घरात या घटनेनी एकदम शांतता पसरली. लग्नाची स्वप्न पाहणारी मुलगी आता रूग्णालयात उपचार घेत आहे. आता ती तिच्या आईचे तोंडही पाहू इच्छित नाही. ही घटना ऐकल्यानंतर ती आजारी पडली. तिला रुग्णालयात दाखल करावे लागले.
आम्हाला आई नको फक्त वडिलांची कमाई परत द्या
आता कुटुंबाने या संपूर्ण प्रकरणात पोलिसांकडे दाद मागितली आहे. महिलेचा पती जितेंद्रने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पत्नीच्या बेपत्तातेची तक्रार दाखल केली. जितेंद्र सांगतात की, त्यांची पत्नी केवळ घरातून पळून गेली नाही तर सुमारे अडीच लाख रुपये रोख आणि मौल्यवान दागिनेही घेऊन गेली आहे. हे पैसे आणि दागिने मुलीच्या लग्नासाठी वाचवले होते. या प्रकरणात, महिलेची मुलगी शिवानी देखील पुढे आली आहे आणि तिने पोलिसांना भावनिक आवाहन केले आहे. शिवानी म्हणते, माझ्या आईने आमच्या कुटुंबाचे नाव खराब केले आहे.आम्हाला आता त्यांच्याशी कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत, पण आईने वडिलांकडून घेतलेले कष्टाचे पैसे आम्हाला परत हवे आहेत.
डेप्युटी एसपी महेश कुमार याप्रकरणी माहिती देताना म्हणाले की, लग्नापूर्वी मद्रक पोलिस स्टेशन परिसरातील एका गावातून तिच्या होणार्या जावयासह पळून गेलेल्या महिलेचा पोलिस सतत शोध घेत आहेत. महिलेच्या पतीने पोलिस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली होती, ज्याच्या आधारे तपास सुरू आहे. ज्या तरुणासोबत ही महिला पळून गेली आहे तो तिचा होणारा जावई आहे आणि पूर्वी तो उत्तराखंडमधील रुद्रपूरमध्ये काम करत होता. प्राथमिक तपासात पोलिसांना माहिती मिळाली आहे की दोघेही बसने उत्तराखंडला निघाले असावेत. या दिशेने पुढे जात पोलिसांनी आता दोन्ही मोबाईल नंबरचे कॉल डिटेल्स काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच दोन्ही मोबाईल फोनचे आयएमईआय नंबर देखील तपासले जातील, जेणेकरून त्यांचे अचूक स्थान शोधता येईल आणि ते लवकरात लवकर सापडतील.
