एक्स्प्लोर
Ruturaj Gaikwad : ऋतुराजचे एका षटकात 7 षटकार, नाबाद 220 धावांची खेळी : ABP Majha
महाराष्ट्राचा कप्तान ऋतुराज गायकवाडने अनोख्या विश्वविक्रमाला गवसणी घातली. विजय हजारे चषकाच्या उप-उपांत्य फेरीत त्याने उत्तरप्रदेशचा फिरकी गोलंदाज शिवा सिंगला एका षटकात सात षटकार ठोकले. या षटकात एक नोबॉलसह ४३ धावा मिळाल्या. एकदिवसीय सामन्यात एका षटकात ७ षटकार ठोकणारा ऋतुराज जगातला पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. ऋतुराजने १५९ चेंडूत १० चौकार आणि १६ षटकारांच्या सहाय्याने नाबाद २२० धावांची खेळी केली.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















